जामखेड- ल. ना. होशिंग विद्यालयातील कलाशिक्षक मुकुंद घनशाम राऊत गेल्या 23 वीस वर्षापासून शाळेमध्ये कलाशिक्षक म्हणून काम करताना विद्यार्थ्यांना चित्र व शिल्प शिकवताना स्वतःच्या कामाला इच्छा असूनही वेळ मिळत नाही. वेळ मिळालातर चित्रकार जागा होत नाही.सध्या लॉकडाऊन काळामध्ये घरी असताना त्यामध्ये चित्र-शिल्प तयार काम सुरू केले आहे.तसेही प्रत्येक कलावंत संवेदनशील असतात. या कोरोनामुळे आपल्यावर जी राष्ट्रीय आपत्ती आलेली आहे. त्यामुळे या लॉक डाऊन काळामध्ये लोकांना आलेल्या अडचणी काहींना झालेला त्रास पाहून ऐकून मन हेलावून जात आहे. यात प्रत्येक कलावंत आपापल्या परीने व्यक्त होणारच मॉडर्न आर्ट पेंटिंग तयार करताना नकळतपणे रंग, रेषा, आकार यांच्या साह्याने हे व्यक्त होत आहे.
त्याचबरोबर लाकडी शिल्प तयार करताना निसर्गात सापडलेले नॅचरल आकार यात काही बदल करून शिल्प तयार करण्याचे काम केले आहे महाराष्ट्रातील पहिला कलाशिक्षक ज्याने स्वतःची चित्र विक्री करून नाम फाउंडेशन प्रत्यक्ष नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्याकडे सण 2015 मध्ये बीड या ठिकाणी 51 हजार रुपये दिले. व त्याबरोबर पाणी फाउंडेशन जामखेड तालुक्यातील सावरगाव या ठिकाणी सर्व सहकारी व विद्यार्थी यांच्या सोबत काम करण्यास मिळाली तसेच तालुक्यातील पत्रकार श्री सत्तार शेख संडे स्कूल मुलांसाठी काम करतात.त्या ठिकाणी एक दिवस काम करण्याची संधी मिळाली तोआनंद शब्दात वर्णन करता येणार नाही.
आतापर्यंत काही प्रदर्शन केली. त्यामध्ये वैयक्तिक असतील ग्रुप्स असतील माजी विद्यार्थ्यांचे सोबत व शाळेतील विद्यार्थ्यांचे हे बेटी बचाव बेटी पढाव ,रक्तदान श्रेष्ठदान ,झाडे लावा झाडे जगवा, पाणी आडवा पाणी जिरवा, अशा काही विषयांवर प्रदर्शन झाली. यामध्ये ही माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचे नगर या ठिकाणीच्या प्रदर्शनांमध्ये प्रसिद्ध शिल्पकार आदरणीय प्रमोदजी कांबळे सर यांनी भाषणामध्ये आम्ही सर्वजण चित्र शिल्प तयार करतो. श्री राऊत सर ही तयार करतात.पण त्याबरोबर ते चित्र प्रसार व चित्रसाक्षरतेचे ही चांगलं काम करतात याचा मला अभिमान वाटतो हे वाक्य म्हणजे माझ्यासाठी आशीर्वादच होय.या प्रेरणेने आजही काम सुरू आहे. लना होशिंग विद्यालयातील व संस्थेतील सर्व सहकारी यासगळ्यांचे नेहमी मिळणारे सहकार्य व पीपल्स एज्युकेशन सोसायटी सर्व संचालक नेहमी पाठीशी उभे असतात