पिंपरी -शहरातील 17 केंद्रांवर मंगळवारी (दि. 20) 18 वर्षापुढील सर्व नागरिकांना करोना लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेण्याची सुविधा देण्यात आली आहे. तर, हेल्थकेअर वर्कर, फ्रंटलाइन वर्कर आणि 60 वर्षावरील नागरिकांना प्रिकॉशन डोस घेता येणार आहे. प्रत्येक केंद्रावर 300 लस उपलब्ध असणार आहे.
कोव्हॅक्सिन लस 14 केंद्रांवर मिळणार आहे. 14 वर्षापुढील सर्व नागरिकांना पहिला, दुसरा डोस घेता येणार आहे. त्याशिवाय, हेल्थकेअर वर्कर, फ्रंटलाइन वर्कर आणि 60 वर्षापुढील नागरिकांसाठी प्रिकॉशन डोसची सुविधा असणार आहे. प्रत्येक केंद्रावर 300 लसची सुविधा दिली आहे. 12 ते 14 वयोगटातील मुलांसाठी कोर्बेव्हॅक्स ही लस 8 केंद्रांवर उपलब्ध असेल. प्रत्येक केंद्रावर 500 लसची सुविधा असेल.