महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये काम करणारे काही कोविड योद्धे मानधनावर कार्यरत आहे. त्यांना नियमित करण्याच्या मागणीबाबत पाठपुरावा करण्यात येईल. एसटी कर्मचाऱ्यांचीही सरकारी सेवेत सामावून घेण्याची मागणी आहे.
टोपे म्हणाले, संत तुकाराम महाराज यांनी म्हटले होते की, “भले तरी देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ।।’ त्यांचा हा संदेश जीवन जगताना उपयुक्त ठरतो. संतांनी सांगितलेले विचार हे आपल्या जीवनाला नवी दिशा दाखविण्याचे काम करतात. जिथे विज्ञान थांबते तिथे अध्यात्म सुरू होते.
नागरिकांनी दहा लाखांपर्यंतची विकासकामे सुचवावीत
सार्वजनिक वचानालय, पाणीपुरवठा, मलनि:स्सारण व इतर या कामांचा समावेश आहे. तर लोकारोग्य शीर्षकाखाली स्मशानभूमी, घाट, आरोग्य निरीक्षक केबीन, संडास व मुताऱ्या, कचराकुंड्या, कचराडेपो, कोंडवाडा, कत्तलखाना, सरफेस गटर्स, गावठाण गटर्स, नाला ट्रेनिंग व इतर ही कामे सुचवु शकणार आहेत. एक व्यक्ती एकापेक्षा अधिक कामे सुचवू शकतात.