वाघोली – वाघोली परिसरातील मजुरी करणारे स्थलांतरीत दगडखाण कामगार व कष्टकरी महिलांसाठी संतुलन संस्थेच्या वतीने मोफत कोविशिल्डचे लसीकरण करण्यात आले. कोविडच्या महामारीने त्रस्त झालेला असंघटीत कष्टकरी व शेतमजुरांना हाताला नाही काम, ताटलीत नाही अन्न ,जगायचं कस या जगण्या मरण्याच्या प्रश्नाशी झुंज देत असलेला कष्टकरी वर्ग स्वसंरक्षणासाठी विकत कोविडची लस घेऊ शकत नाही म्हणून आजपर्यन एकही दगडखाण कामगाराने कोविशिल्ड ची लस घेतलेली नव्हती.
गेली सुमारे पंचवीस वर्षापासून वंचितांच्या न्याय हक्कासाठी अविरत रचनात्मक संघर्ष व विकास कार्य करणाऱ्या संतुलन संस्थेने रॉबिन हूड आर्मी व ए.सी.आय.वल्ड वाईड यांच्या संयुक्त विद्यमाने संतुलन कम्युनिटी सेंटर गोरे वस्ती येथे एका दिवसात पाचशेहुन अधिक वाघोली, केसनंद, कोलवडी व खराडी परिसरातील दगडखाण कामगार, घरेलू कामगार व शेतमजूर महिलांसाठी मोफत कोविशिल्ड लसीकरण, कोविडची तपासणी तसेच रेशन कीटचे वितरण करण्यात आले.
संतुलन संस्थेच्या संस्थापिका संचालिका पल्लवी रेगे यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत ही सुरुवात असून प्रत्येक कष्टकरी व शेतमजूर महिलांना मोफत कोविशिल्ड देण्याचा संतुलनाचा संकल्प असल्याचे मत मांडले.
कार्यक्रमाला उपस्थित तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब सातव पाटील यांनी संतुलन संस्थेला जणू देवदूताचा अवतार आहे अशा शब्दात संतुलन कार्याविषयी भावना व्यक्त केल्या. माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी संतुलन संस्थेचे तळागाळातील समुदाया बरोबरील कार्य गौरवास्पद असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माजी सरपंच वसुंधरा उबाळे यांनी तुलसी पूजन करून संतुलनला आमची साथ कायमची राहील आशा भावना व्यक्त केल्या. माजी सरपंच शिवदास उबाळे यांनी सर्वाना शुभेच्या दिल्या.
कार्यक्रम प्रसंगी रॉबिन हूड आर्मीचे प्रतिनिधी सुनील पवार व प्रदीप रहेजा बुन्ती तसेच आय.सी.आय.वल्डवाईड च्या अनघा धारा यांचा सत्कार करण्यात आला. दगडखाण कामगार परिषदेचे अध्यक्ष बी. एम. रेगे. यांनी उपस्थितांचे आभार मांडले. कार्यक्रमाचे संयोजन संतुलन कार्यकर्ते आदिनाथ चांदणे, किरण गाडे, उर्मिला काची, निखील गायकवाड, पांडुरंग भालेराव, अश्विनी पात्रे, युनस मसिह, प्रिया डाडर, स्नेहप्रभा वैराळ, राजेंद्र राठोड, सुनील विल्यम आदींनी केले. मोठ्या संख्येने दगडखाण कामगार व कष्टकरी महिला यांनी लसीकरणाचा उस्फुर्ततेने लाभ घेतला आहे.