नवी दिल्ली – देशातील सक्रिय कोविड रूग्णांचे प्रमाण आता लक्षणीयरित्या घटले असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांत 90 नवीन कोरोनाव्हायरस संसर्गाची नोंद झाली आहे. तर सक्रिय प्रकरणांची संख्या आता 1,925 इतकी खाली गेली आहे.
या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,44,59,660 वर पोहोचली आहे, तर मृत्यूचे प्रमाण 1.18 टक्के नोंदवले गेले आहे.मधल्या काळात कोविड रूग्णांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत असल्याने धास्तीचे वातावरण निर्माण झाले होते.
त्यामुळे संपुर्ण देशभर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठीच तयारी करण्यात आली होती. या काळात आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सेवेसह ऑक्सिजनचे प्रमाणही पुरेसे राहिल याची दक्षता घेण्यात आली होती.