नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी किंवा त्यांची मुलगी गोव्यातल्या त्या रेस्टॉरंटच्या मालक नाहीत. त्यांनी लायसन्ससाठी कधी अर्जही केला नव्हता, असे म्हणत दिल्ली उच्च न्यायालयाने इराणी कुटुंबीयांना दिलासा दिला आहे. गोव्यातील सिली सोल्स नामक बार अँड कॅफे इराणी यांच्या मुलीचा असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला होता.
त्या विरोधात इराणी यांनी कॉंग्रेस नेत्यांच्या विरोधात दावा दाखल केला होता. त्यात आज न्यायालयाने त्यांना दिलासा दिला. रेस्टॉरंट किंवा जागाही इराणी यांच्या मालकिची नसल्याचे दिल्ली न्यायालयाने स्पष्ट केले. पवन खेरा, जयराम रमेश आणि नेटा डिसूझा या कॉंग्रेस नेत्यांना इराणी यांनी नोटीस बजावली होती व बिनशर्त माफीची मागणी केली होती.