अनुराधा पौडवाल आई असल्याचा दावा करणाऱ्या महिलेला कोर्टाचा धक्का

नवी दिल्ली – केरळच्या तिरुअनंतपुरम शहरातील एका महिलेने पद्मश्री आणि राष्ट्रीय फिल्म पुरस्कार विजेती अनुराधा पौडवाल यांची मुलगी असल्याचा दावा काही दिवसांपूर्वी केला होता. या महिलेचे नाव करमाला असून या महिलेने जिल्हा कुटुंब न्यायालयात अनुराधा यांच्या विरोधात खटला दाखल केला होता. याशिवाय ५० कोटींची नुकसाना भरपाईचीही मागणी केली होती. दरम्यान, आता या प्रकरणातून अनुराधा पौडवाल यांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यावर न्यायालयानं स्थगिती दिली आहे. याशिवाय करमाला या महिलेला नोटीस देखील जारी करण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

Some more from the Uttarakhand Global Investors Summit at the CM’s house in Dehradun recently. Thank you for your being such heartwarming hosts!

A post shared by Anuradha Paudwal (@anuradhapaudwalonline) on

महिलेचा दावा काय?

१९७४ मध्ये जन्माला आलेल्या करमालाने असा दावा केला आहे की, सुमारे पाच वर्षांपूर्वी माझ्या वडिलांनी मृत्यूपूर्वी मला हे सत्य सांगितले कि, मी फक्त चार दिवसांची असताना अनुराधा यांनी मला माझ्या पालकांकडे सोपवलं होतं, असं वडिलांनी आपल्याला सांगितल्याचं करमाला म्हणाली.

अनुराधाचे बिजी सिंगिंग शेड्यूल आणि करिअरमधील यशामुळे अनुराधा माझे पालनपोषण करू शकत नव्हती. म्हणून अनुराधाने असे केले. तेव्हा मी फक्त ४ दिवसांची होती.

पोंनाचन सैन्यात होते आणि त्यांची पोस्टिंग महाराष्ट्रात होती. ते अनुराधा पौडवाल यांचे मित्रही होते. मग त्यांची बदली केरळमध्ये झाली, असंही करमालाने सांगितलं.

करमाला मोडेक्सच्या माहितीनुसार, याबाबतचं सत्य माझी आई अॅग्नेसलाही माहित नाही. पोंनाचन आणि अॅग्नेस यांना तीन मुलं आहे. त्यांनी करमालाचं पालनपोषण आपल्या चौथ्या अपत्याप्रमाणे केलं. 82 वर्षीय अॅग्नेस सध्या अंथरुणाला खिळल्या असून त्याअल्झायमरने ग्रस्त आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.