पुरंदर विमानतळासाठी अधिकाऱ्यांची नियुक्‍ती

1 फेब्रुवारीपासून कामावर होणार रुजू 

पुणे – पुरंदर तालुक्‍यातील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी शासनाने 7 गावांमधील 2 हजार 832 हेक्‍टर जागा निश्‍चित केली आहे. यासाठी शासनाने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस (एमएडीसी) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून शासनाने मान्यता दिली आहे. या क्षेत्राचा आराखडा तयार करण्यासाठी आवश्‍यक असणारे मनुष्यबळ पुरविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांची नियुक्ती केली जाणार असून येत्या 1 फेब्रुवारीपासून हे अधिकारी कामावर रुजू होणार आहे.

पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्थापन करण्यात आलेल्या “पुणे (पुरंदर) इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड कंपनी’ची स्थापना केली आहे. पुरंदर विमानतळासाठी शासनाने हद्द निश्‍चित केली असून त्याचे सर्व्हे नंबरही जाहीर केले आहे. यामुळे विमानतळाच्या जागेवर शिक्‍कामोर्तब झाले आहे.

विमानतळासाठी शासनाने निश्‍चित केली असली तरी प्रत्यक्ष विमानतळासाठी 1800 ते 2200 हेक्‍टर जागेची आवश्‍यता आहे. त्यामुळे विमानतळाची प्रत्यक्ष जागा उर्वरित जागेचे नियोजन करण्याचे काम एमएडीसीकडून सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी नगररचना विभागासह अन्य विभागातील अधिकाऱ्यांची आवश्‍यकता आहे. या सर्व कामकाजासाठी आवश्‍यक असणारे मनुष्यबळ उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. प्रत्यक्ष विमानतळ उभारून उर्वरित राहणाऱ्या जागेवर विमानतळाला अडथळा होणार नाही, यावर देखरेख ठेवण्याचे काम ही यंत्रणा करणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.