कोर्टाने मागवला वढेरांचा प्रतिसाद

नवी दिल्ली – सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांना मंजुर करण्यात आलेला अटकपुर्व जामीन रद्द करण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात केली असून त्या प्रकरणी आज कोर्टाने वढेरा यांना त्यांचे म्हणणे सादर करण्यात सांगितले आहे. ट्रायल कोणाने वढेरा यांना अटकपुर्व जामीन मंजूर केला आहे.

वढेरा यांचे निकटवर्तीय मनोज अरोरा यांनाही या प्रकरणी अटकपुर्व जामीन मंजूर झाला होता तोही रद्द करण्याची ईडीची मागणी आहे. वढेरा यांनी लंडन मध्ये एक मालमत्ता घेतली असून ती मालमत्ता त्यांनी आपल्या नावांवर दाखवलेली नाही. ही मालमत्ता भारतीय चलनात सुमारे 17 कोटींची आहे.

या प्रकरणात वढेरा आणि त्यांचे सहकारी मनोज अरोरा हे सहकार्य करीत नाहीत असे ईडीच्या वकिलांनी कोर्टात आज झालेल्या सुनावणीच्यावेळी सांगितले. मनि लॉड्रिंग कायद्यान्वये हा खटला दाखल आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.