सिक्‍कीम मध्ये नव्या मुख्यमंत्र्यांनी घेतली शपथ

गंगटोक – सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा या पक्षाचे अध्यक्ष प्रेमसिंग तमांग उर्फ पी. एस. गोलाय यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल गंगाप्रसाद यांनी त्यांना पदाची शपथ दिली. सिक्कीम विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी गोलाय यांची आज निवड झाली, पण त्यांनी स्वता ही विधानसभा निवडणूक लढवलेली नव्हती. पलजोर स्टेडियम मध्ये हा शपथविधी झाला यावेळी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा या पक्षाच्या अकरा सदस्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

यावेळी पक्षाचे शेकडो समर्थक शपथविधीला उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग हेही यावेळी उपस्थित होते. सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा हा पक्ष केवळ 2013 साली स्थापन झाला आहे. या पक्षाला राज्यात 30 पैकी 17 जागा मिळाल्या आहेत. या पक्षाने राज्यात गेली 24 वर्षे सत्तेवर असलेल्या सिक्कीम डेमोक्रॅटिक पक्षाच्या सरकारचा दारूण पराभव केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)