अकलूज, – अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून व्हिडिओ चित्रीकरण करून पैशांसाठी ब्लॅकमेल केल्याच्या आरोपातून पंचवटी – अकलूज येथील आसिफ शेख व हिना शेख या पती-पत्नीची जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एन. पाटील यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
अकलूज येथील मसाले व्यापाऱ्याची अल्पवयीन भाची बरोबर मैत्री करून गोड बोलून तिच्याशी जवळीक करून तिच्या संमतीने लॉजवर नेऊन पहिल्यांदा शरीर संबध केले. त्यानंतर तिच्या संमती वाचून फिर्यादीच्या घरातील देवघराचे खोलीमध्ये दोन ते तीन वेळा बलात्कार केला तसेच उसाचा रसात गुंगीयुक्त पदार्थ टाकून तिच्यासोबत शारीरिक संबंध करतानाचे तिचे मोबाइलद्वारे केलेले व्हिडीओ चित्रिकरण व्हायरल करण्याची धमकी देवून फिर्यादीकडून प्रथम 16हजार रूपये,
डिसेंबर 2016 पर्यंत 40 हजार रूपये घेऊन मारहाण केली. तसेच 1 लाख 75 हजार रूपयांची मागणी केली. तसेच हिना आसिफ शेख हिनेदेखील फिर्यादीस मोबाइलद्वारे काढलेल्या व्हिडीओची धमकी देवून 10 हजार रूपयांची मागणी केल्याबाबत तक्रार दाखल केली होती. तसेच आरोपी असिफ हा पिडीतेच्या मामाकडे नोकरीस होता. पिडीतेचे मामा हे सोलापूर जिल्ह्यातील मसाला व्यापारी आहेत.
आरोपी याने खटला दाखल करण्याआगोदर नोकरी सोडल्याने पीडितेच्या मामाचे नुकसान झाले होते. त्यामुळे पिडीताने व तिच्या मामाने संगनमत करून तक्रार दाखल केली होती. असे असताना आरोपी विरूद्ध गुन्हा सिद्ध होईल असा पुरावा न मिळाल्याने यातील आरोपींची न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. यावेळी आरोपींतर्फे ऍड. वजीर शेख, ऍड. हसीना शेख, ऍड. रणजित भोसले व ऍड. एस. एम. सावंत व सरकारी पक्षातर्फे ऍड.पाटील यांनी काम पाहिले.