पुणे – एजीए मॅनेजमेंट आयोजित पहिल्या एमरल्ड करंडक अजिंक्यपद कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धेत पुणे हरीकेन्स संघाने सलग दुसरा विजय मिळवला. तर फ्रेन्ड्स क्रिकेट क्लब संघाने स्पाटर्न सुपर किंग्ज् संघाचा पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली.
या सामन्यात पुणे हरीकेन्स संघाने बुरहान्स पुणे स्ट्रायकर्स संघाचा 26 धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला. पुणे हरीकेन्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमावून 182 धावा जमविल्या.
या आव्हानाचा पाठलाग करताना बुरहान्स पुणे स्ट्रायकर्सचा डाव 15.4 षटकात 156 धावांवर आटोपला. अन्य लढतीत फ्रेन्ड्स क्रिकेट क्लबने स्पाटर्न सुपर किंग्ज संघाचा 77 धावांनी पराभव केला.
फ्रेन्ड्स संघाने 20 षटकात 223 धावांचा डोंगर उभा केला. या आव्हानाला उत्तर देताना स्पाटर्न सुपर किंग्जचा डाव 20 षटकात 146 धावांवर आटोपला.