पुणे – डेक्कन जिमखाना टेनिस विभाग आयोजित अतुल रुणवाल मेमोरियल डेक्कन जिमखाना टेनिस सोशल स्पर्धेत खुल्या दुहेरी गटात अथर्व अय्यर व क्षितिज कोतवाल, अर्जुन करमरकर व अभय घोगरे, परेश पुंगलिया व चिराग रुणवाल यांनी आपली विजयी मालिका कायम ठेवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत राउंड रॉबिन फेरीत क गटात अथर्व अय्यरने क्षितिज कोतवालच्या साथीत मानसी गोडबोले व अमित मेहेंदळे 6-1 यांचा सहज पराभव करून तिसऱ्या विजयासह उपांत्य फेरी गाठली.
अ गटात गट परेश पुंगलिया व चिराग रुणवाल यांनी साकेत गोडबोले व राहुल मेंगळे या जोडीचा 6-0 असा, तर दुसऱ्या सामन्यात परेश पुंगलिया व चिराग रुणवाल यांनी हिमांशू चौधरी व अभिजित गायकवाड यांचा 6-0 अशा सारख्याच फरकाने पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.
क गटात अखेरच्या लढतीत मानसी गोडबोले व अमित मेहेंदळे यांनी अभिषेक रानडे व आतिश केकरे या जोडीवर 6-4 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला.
सविस्तर निकाल : खुला दुहेरी गट : राउंड रॉबिन फेरी : गट अ : परेश पुंगलिया/चिराग रुणवाल वि. वि. साकेत गोडबोले/राहुल मेंगळे 6-0. गट अ : परेश पुंगलिया/चिराग रुणवाल वि. वि. हिमांशू चौधरी/अभिजित गायकवाड 6-0. गट क : मानसी गोडबोले/अमित मेहेंदळे वि. वि. अभिषेक रानडे/आतिश केकरे 6-4. गट क : अथर्व अय्यर/क्षितिज कोतवाल वि. वि. मानसी गोडबोले/अमित मेहेंदळे 6-1.