मुंबई : राज्यात कोरोनाचे नवे बाधित ७२ पेक्षा अधिक सापडल्याने बाधितांच्या संख्येने ३०० चा टप्पा ओलांडला. मात्र यामुळे मुंबईतील परिस्थिती अधिक धोकादायक बनल्याचे स्पष्ट झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील १४६ ठिकाणं सील करण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी करोनाचे रूग्ण सापडले आहेत किंवा ज्या ठिकाणी करोनाग्रस्तांच्या संपर्कात येऊन करोनाची लागण झाली आहे, अशी ठिकाणं पालिकेच्यावतीनं सील करण्यात आली आहे. पोलिसांच्या मदतीनं बॅरिकेंटींग करून हे परिसर सील करण्यात आले आहेत.दक्षिण मुंबईतील ४८ जागा आहेत. यात मलबार हिल्स, वाळकेश्वर, पोद्दार रोड, बेलासिस रोड, वरळी कोळीवाडा आणि प्रभादेवीसारख्या परिसरांचा समावेश आहे.