मुंबई : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. जगभरात तब्बल १३७ देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. एका अहवालानुसार, शनिवारपर्यंत जगभरात लागण झालेल्या लोकांची संख्या ही एक लाख ५०, हजाराच्या वर होती. या विषाणूमुळे आतापर्यंत जगभरात पाच हजार ५०० पेक्षा अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तर भारतात दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Maharashtra: Malls closed in Nagpur following the state govt order. #Coronavirus pic.twitter.com/hDhk0zfphC
— ANI (@ANI) March 15, 2020
दरम्यान आरोग्य कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी १२ वाजेपर्यंत देशभरात एकूण १०७ जणांना या विषाणूची लागण झाली आहे. दिल्ली, महाराष्ट्रसह अनेक राज्यात शाळा, महाविद्यालये, मॉल्स, सिनेमा हॉल बंद करण्यात आले आहेत.
The 218 Indians who landed from Milan, Italy at Delhi airport will be shifted to Indo-Tibetan Border Police's Chhawla camp. #coronavirus pic.twitter.com/ER6ylfLUCE
— ANI (@ANI) March 15, 2020
ब्रिटनच्या एका नागरिकाची कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दुबईला जाणाऱ्या एमिरेट्सच्या विमानातील सर्व २८९ प्रवाशांना केरळच्या कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले आहे. या सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात येत असून, या सगळ्यांना विलीगीकरण कशात ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
अंदमान आणि निकोबार पर्यटकांसाठी बंद
कोरोना विषाणूचा फटका पर्यटनालासुद्धा बसला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अंदमान आणि निकोबार बेट पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. एक अधिकृत सूचनेद्वारे पर्यटकांनी १६ मार्च ते २६ मार्च दरम्यान या बेटांवर जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे.