पिंपरी – कोविड-19 संशयितांच्या करोना तपासणीचा अहवाल (रिपोर्ट) दोन दिवसांत द्यावा, अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाने आरोग्यमंत्री राजेश टोपे व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
कोविड तपासणी अहवाल दोन दिवसांत येणे अपेक्षित असते. मात्र, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणामुळे अहवालास वेळ लागत असल्याने मधुमेह, रक्तदाब असलेल्या नागरिकांना त्रास होत आहे. रॅपिड ऍण्टिबॉडी टेस्टचा तपासणी अहवाल दोन दिवसांत येणे अपेक्षित असते. मात्र, वेळेत न मिळण्यास आरोग्य विभागाचे कर्मचारी जबाबदार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.