सातारा : जिल्ह्यात आणखी 38 बाधितांचा मृत्यू

सातारा: (प्रतिनिधी) – जिल्ह्यात करोनाच्या गंभीर रुग्णांसाठी कोविड उपचार केंद्रे आणि ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर बेडस्‌ वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन प्रयत्नशील असतानाच बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढतच आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असलेल्या आणखी 38 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय व विविध खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असताना सातारा तालुक्‍यातील शेळकेवाडी येथील 65 वर्षीय महिला, अपशिंगे येथील 62 वर्षीय महिला, वळसे येथील 45 वर्षीय पुरुष, संगम माहुलीतील 64 वर्षीय पुरुष, वडुथ येथील 52 वर्षीय महिला, सातारा शहरातील गुजर आळीतील 78 वर्षीय पुरुष, पंताचा गोट येथील 58 वर्षीय महिला, केसरकर पेठेतील 49 वर्षीय पुरुष, शाहूनगर (गोडोली) येथील 65 वर्षीय पुरुष, सातारा येथील 57 वर्षीय पुरुष, कराड तालुक्‍यातील पेरले येथील 75 वर्षीय पुरुष, कसूर येथील 68 वर्षीय पुरुष, विंग येथील 65 वर्षीय महिला, वनवासमाचीतील 69 वर्षीय पुरुष, इंदोलीतील 68 वर्षीय पुरुष, आगाशिवनगरातील 56 वर्षीय पुरुष, विरवडे येथील 58 वर्षीय पुरुष, साळशिरंबे येथील 55 वर्षीय महिला, आणे येथील 77 वर्षीय पुरुष, बेलवडेतील 70 वर्षीय पुरुष, पाल येथील 75 वर्षीय पुरुष, कराडमधील 40 वर्षीय महिला, 65 वर्षीय पुरुष,

वाई तालुक्‍यातील विरमाडे येथील 65 वर्षीय पुरुष, वाई शहरातील धर्मपुरीतील 32 वर्षीय युवक, खटाव तालुक्‍यातील काळेवाडी (डिस्कळ) येथील 83 वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्‍यातील तांदुळवाडीतील 70 वर्षीय पुरुष, खंडाळा तालुक्‍यातील खंडाळा येथील 85 वर्षीय महिला, वाठार कॉलनी (खंडाळा) येथील 72 वर्षीय पुरुष, बावडा (खंडाळा) येथील 64 वर्षीय व 60 वर्षीय पुरुष, जावळे येथील 85 वर्षीय महिला, घाटदरे येथील 68 वर्षीय महिला, शिंदेवाडीतील 69 वर्षीय पुरुष, भादवडेतील 50 वर्षीय पुरुष, शिरवळमधील 53 वर्षीय पुरुष, माण तालुक्‍यातील गोंदवले येथील 70 वर्षीय पुरुष, सांगली जिल्ह्यातील कडेगावमधील 70 वर्षीय पुरुष, या बाधितांचा मृत्यू झाला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.