मुंबई – देशात करोना विषाणूची तिसरी लाट मंदावली असली तरी त्याचा धोका अद्याप टळलेला नाही. अलीकडच्या काळात देशाच्या अनेक भागांमध्ये करोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यातच आता बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानला करोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
शाहरुखला करोना व्हायरसची लागण झाली आहे. एका सूत्राने शाहरुखला करोना संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे. या वृत्तामुळे शाहरुखच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे.
या संदर्भात अभिनेता शाहरुख आणि त्याच्या टीमकडून कोणतीही पुष्टी केलेली नाही. शाहरुखने 3 जून रोजी त्याच्या ‘जवान’ चित्रपटाची घोषणा केली होती. दिग्दर्शक अॅटली यांचा हा चित्रपट आहे, ज्याद्वारे तो बॉलिवूडमध्ये नशीब आजमावणार आहे.
रिपोर्टनुसार, शाहरुखच ही तर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना करोना व्हायरसची लागण झाली आहे.
अभिनेत्री कतरिना कैफला आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांना देखील करोनाने घेरले आहे. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार करोना संसर्गाच्या विळख्यात अडकला होता.