corona vaccine : पुढच्या महिन्यापासून लहान मुलांनाही लस

नवी दिल्ली -भारतात ऑगस्ट महिन्यात लहान मुलांसाठीची लस येईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी भाजप संसदीय दलाच्या बैठकीत दिली आहे.

पुढच्या महिन्यापासून सरकार लहान मुलांचे लसीकरण सुरु करणार आहे. तसेच भारत जगातील सर्वाधिक लस उत्पादन करणारा देश होत आहे.

कारण अनेक कंपन्यांना लस उत्पादनाचा परवाना देण्यात येत असल्याचे मांडवीय यांनी यावेळी सांगितले. सध्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्‍सिन लसीची 2 वर्षांवरील मुलांवर चाचणी सुरु आहे. 

ही चाचणी अंतिम टप्प्यात असून त्याबाबत निकाल पुढच्या महिन्यात येणार आहे. दोन वर्षांपासूनच्या मुलांना या लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. 

आता लसीचा दुसरा डोस पुढच्या आठवड्यात देण्यात येणार आहे. दिल्लीच्या एम्समध्ये 6 ते 12 वयोगटातील मुलांना कोव्हॅक्‍सिन लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. 

त्यानंतर कोव्हॅक्‍सिनचा पर्याय उपलब्ध होणार आहे. तर, झायडस कॅडिलाने 12 ते 18 वयोगटातील डीएनए आधारीत करोना लसीचे क्‍लिनिकल ट्रायल नुकतेच पूर्ण केले आहे.

लवकरच ही लस देशात उपलब्ध होणार असल्यामुळे परवानगी मिळताच हा पर्याय पालकांसमोर असणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.