पुणे ( Corona Vaccination Pune ) – करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सोमवारीही बंद राहणार आहे. लसींचा पुरवठा न झाल्याने महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.
शहरात रविवारीही लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. तसेच मागील आठवड्यातही तीन ते चार दिवस लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. लसींचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने लसीकरण मोहीम पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यात येऊ शकत नाही.
महापालिकेने जादा लसींची मागणी केली आहे. परंतु राज्याकडेच लस पुरेशा क्षमतेने येत नसल्याने शहराला लसींचा पुरेसा पुरवठा करता येत नाही. सध्याही तीच परिस्थिती असून, सोमवारी लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. ( Corona Vaccination Pune )