केडगाव : दौंड तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या केडगाव येथील एका खासगी डॉक्टरांचा कोरोनाअहवाल रविवारी सकाळी पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली.
केडगाव येथील मुख्य चौकात त्या डॉक्टरांची ओपीडी आहे. अचानक त्रास होऊ लागल्याने त्यांनी लोणी काळभोर याठिकाणी तपासणी केली असता त्यांचा प्रथम दर्शनी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे केडगावकरांची चिंता आता वाढली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी, शिवाय आवश्यक कामासाठीच बाहेर पडावे, हात स्वच्छ धुवावेत, मास्क वापरावा, स्वतः बरोबर इतरांचीही काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. रासगे यांनी केले आहे.