#Corona: ब्रेथ ऍनालायझर चाचणी तात्पुरती थांबवावी

कोची : कोरोना विषाणूंचे तीन बाधीत आढळल्यानंतर केरळ पोलिसांनी ब्रेथ ऍनालायझर चाचणी घेणे थांबवण्याचे आदेश पोलिसांनी दिले. त्यामुळे रात्री नेहमी या त्रासाने ग्रस्त असणाऱ्यांनी “सूर्य आता पश्‍चिमेकडे उगवला’ अशी प्रतिक्रिया समाज माध्यमांत देण्यास सुरवात केली आहे.

केरळचे पोलिस महासंचालक लोकनाथ बेहेरा यांनी यांनी एक परिपत्रक काढून हे आदेश दिले आहेत. त्यात त्यांनी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्याची तपासणी घेण्यासाठी घेण्यात येणारी ब्रेथ ऍनालायझर चाचणी तात्पुरती थांबवावी, असे आदेश दिले. मात्र पोलिस अन्य पध्दतीने आपली चाचणी सुरू ठेवतील, असे म्हटले आहे.
ड्रंक ऍन्ड ड्राइव्हचा गुन्हा दाखल करण्यापुर्वी ब्रेथ ऍनालायझर चाचणी आवश्‍यक असल्याचे आदेश केरळ न्यायालयाने दिले आहेत.

कोची काही भागात ही चाचणी पोलिसांकडून नियमित घेण्यात येते. त्यामुळे समाज माध्यमांत ही चाचणी थांबवल्याबद्दल विनोदी मेसेज फिरत आहेत. सूर्य पश्‍चिमेकडे उगवला… दारू पिणाऱ्यांना पोलिसांनी पकडले तर त्याला कोरोना झालेला असतो, असे या संदेशाचे स्वरूप आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.