“आरआरआर’ पुढच्या वर्षी 8 जानेवारीला

आलिया भट आणि अजय देवगण प्रथमच “आरआरआर’मध्ये एकत्र काम करत आहेत. हा सिनेमा पुढच्या वर्षी 8 जानेवारीला तेलगू भाषेत रिलीज होणार आहे. यावर्षी जुलैमध्ये तेलगू आवृत्ती रिलीज होणार असे पूर्वी जाहीर केले गेले होते. पण आता ही तारीख पुढे ढकलली गेली आहे. एकूण 10 भाषांमध्ये “आरआरआर’ रिलीज होणार आहे.

इतर आलिया आणि अजयव्यतिरिक्‍त ओलिविया मॉरिस, रे स्टिव्हनसन आणि ऍलिसन डूडी हे विदेशी कलाकारही यामध्ये असणार आहेत. दक्षिणेतील एन.टी.रामाराव यांचे चिरंजीव एन.रामाराव ज्युनिअर, राम चरण हे दक्षिणेतील कलाकारही दिसणार आहेत. स्टिव्हनसन आणि डूडी हे प्रमुख दाम्पत्याच्या भूमिकेत असतील. तर मॉरिस ही सिनेमाची नायिका असेल.

स्वातंत्र्यपूर्व काळातील, 1920 च्या काळातील कथा त्यामध्ये दाखवली असणार आहे. अलुरी सितारामा राजू आणि कोमाराम भीम या स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनावरील या कथेमध्ये एनटी रामराव ज्युनिअर हे कोमाराम भीम यांच्या भूमिकेत तर राम चरण हे अलुरी सितारामा राजू यांच्या भूमिकेत असणार आहेत. अजय देवगण आणि आलिया कोणत्या पात्राच्या भूमिकेत दिसणार आहेत, हे अद्याप समजलेले नाही.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.