चिंताजनक! पूर्वी बधिताच्या संपर्कात 10 मिनीटे राहील्यास करोना होत होता, ते प्रमाण आता केवळ…

निरोगी व्यक्ती 1 मिनीटासाठी जरी करोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आली तरी त्या व्यक्तीला करोना होण्याचा धोका असल्याचे आढळून आले आहे.
 
दिल्लीतील अचानक आणि प्रचंड रूग्णवाढीमागे हेच कारण असल्याचे सांगितले जाते आहे. पूर्वी करोनाबधिताच्या संपर्कात 10 मिनीटे राहील्यास करोना होत होता. ते प्रमाण आता 1 मिनीटापर्यंत खाली आले आहे.
 
याबाबत श्‍वास विकारातील तज्ञ डॉ. संजीव नय्यर म्हणाले की, हा विषाणू खूप वेगवान असून तो एक मिनीटात दुसऱ्या व्यक्तीला संक्रमित करू शकतो.
 
पूर्वी दहा मिनीटे बाधिताच्या संपर्कात राहीलात तर धोका होता. मात्र आता तशी स्थिती राहीली नसून एक मिनीटही त्यासाठी पुरेसा ठरतो आहे.
 
दिल्लीच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की येथे 30 ते 40 वयोगटातील लोकांना लागण झाल्याचे प्रमाण अधिक आहे.
 

मात्र याच वयोगटातील लोक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडत असल्यामुळे दिल्लीत करोनाचा प्रसार वेगाने होतो आहे.
 
घरातल्या एका व्यक्तीला जरी करोना झाला तर संपूर्ण कुटुंब बाधित होण्याच्या घटना या दुसऱ्या लाटेत ठळकपणे समोर आल्या आहेत.
 
त्यामुळे कितीही क्‍वारंटाइन झालात तरी एकाच घरात राहणाऱ्या व्यक्ती बाधित होण्यापासून स्वत:ला वाचवू शकणार नाहीत असे तज्ञांचे म्हणणे आहे.
 
लागण झाल्यावर रूग्णाला सुरूवातीला श्‍वास घ्यायला त्रास होतो. त्यानंतर उलटी, जुलाब असा गॅस्ट्रोसदृश त्रास होतो. तसेच त्वचेवर लाल चट्टे अथवा बारीक फोड येणे अशी नवी लक्षणे काही रूग्णांत आढळून आली आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.