‘या’ देशातून करोना हद्दपार; मास्कची बंदी हटवली, लोकांनी एकमेकांना आलिंगन देत साजरा केला आनंदोत्सव

वॉरसॉ, दि. 15 – पोलंडमधील करोना स्थिती आता विलक्षण सुधारली असून तेथील सरकारने लोकांवर लागू करण्यात आलेली मास्क सक्‍ती आता हटवली आहे. सात महिन्यांच्या अवधीनंतर देशातील हॉटेल्स, पब आणि बार वरील निर्बंध काढून टाकण्यात आले असून ते सर्वांसाठी खुले करण्यात आले आहेत. तेथील लोक आता एकमेकांना आलिंगन देत मद्याचे चषक उंचावत चिअर्स करीत असून वातावरणात एकदम खुलेपणा आला आहे.

शनिवारपासूनच पोलंडमध्ये अन्न आणि ड्रिंक्‍स खुल्या वातावरणात घ्यायला अनुमती देण्यात आली आहे. तथापि, काल रात्रीपासूनच लोकांनी रस्त्यांवर गर्दी करून हा आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे. राजधानी वॉरसॉ आणि अन्य शहरांमध्ये लोकांची सार्वजनिक ठिकाणी मोठी गर्दी दिसून येत असून लोक आनंदात बागडताना दिसत आहेत.

अनेक ठिकाणी लोकांनी रस्त्यावरच टेबले टाकून आपल्या आवडत्या बिअरचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली आहे. बार आणि रेस्टॉरंट्‌समध्ये डीजेंचे आवाजही घुमायला लागले आहेत. आज शनिवारचा दिवस तेथील लोकांनी नवीन वर्षांच्या स्वागताच्या दिवसासारखा साजरा केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.