रेमडेसिविरची साठेबाजी करणाऱ्यांवर ‘गुंडा ऍक्‍ट’; ‘या’ राज्य सरकारचा निर्णय

चेन्नई – कोविड आजारसाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिविर औषधांची साठेबाजी करणाऱ्यांवर गुंडा विरोधी कायद्यान्वये कारवाई केली जाईल, असा आदेश तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यांनी तशी कारवाई करण्याची सूचना पोलिसांनापण केली आहे.

त्यानुसार आता पोलिसांनीही कारवाईला सुरूवात केली असून या औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांची त्यांनी धरपकड सुरू केली आहे. अनेकांना या कायद्यान्वये ताब्यातही घेतले आहे. राज्याच्या काहीं भागात ऑक्‍सिजन सिलिंडर्सही काळ्या बाजारात विकले जात आहेत अशा बातम्या आहेत त्या अनुषंगानेही पोलिसांना कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे.

ऑक्‍सिजन आणि रेमडेसिव्हीर या दोन्ही बाबींचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आवश्‍यक ती उपाययोजनाहीं केली जात आहे असेही मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.