ल्हासा, (तिबेट), दि. 15 – तिबेटचे सर्वोच्च नेते म्हणून नवीन लामांची निवड करण्यात चीनचा कोणताही सहभाग असू शकत नाही, असे तिबेट सरकारच्या सेंट्रल तिबेटियन ऍडमिनिस्ट्रेशनचे कार्यकारी प्रमुख म्हणून निवडलेले नेते पेंपा त्सेरिंग यांनी म्हटले आहे. तिबेटी अध्यात्मिक नेत्यांचा वारस निवडणे ही एक गंभीर धार्मिक बाब आहे आणि चीनमधील सरकारचा धर्मावर अजिबात विश्वास नाही, त्यामुेळ् या धार्मिक कार्यात चीनकडून कोणतीही ढवळाढवळ अपेक्षित नाही, असे ते म्हणाले.
पेंपा त्सेरिंग यांची केंद्रीय तिबेट प्रशासनाच्या कार्यकारी शाखा प्रमुखपदी निवड झाल्याची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. अमेरिकेमध्ये नव्याने अध्यक्ष झालेल्या ज्यो बायडेन यांच्या प्रशासनाकडून तिबेटसाठी अमेरिकेचा मजबूत आणि द्विपक्षीय पाठिंबा कायम राहील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
पुढील दलाई लामा यांच्या निवडीचा निर्णय चीनच्या प्रदेशातच घ्यावा, आणि या प्रकरणात भारत किंवा कोणत्याही परदेशी संस्थेने हस्तक्षेप करू नये. असा आग्रह आहे. चीनच्या या आग्रहाच्या पार्श्वभूमीवर त्सेरिंग यांनी चीनवर टीका केली आहे.
ल्हासामधील अनेक लोकांनी दलाई लामांचा उत्तराधिकारी निवडण्याच्या प्रक्रियेला चीनने आक्षेप घेतला आहे. दलाई लामांच्या उत्तराधिकाऱ्याच्या निवडीवर चीन सरकारकडून शिक्कामोर्तब करण्यात यावे, असा दावा चीनने केला आहे. मात्र चीनचा हा दावा विद्यमान दलाई लामांनी फेटाळून लावला आहे. विद्यमान दलाई लामा येत्या जुलै महिन्यात 86 वर्षांचे होणार आहेत.