मुंबई – कोविड निर्बंध अंमलात न आणल्याबद्दल कारवाई करण्याची धमकी देऊन चार सुरक्षा रक्षकांनी एका फॅक्टरी मालकाकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. त्या प्रकरणात या चौघांनाहीं अटक करण्यात आली आहे.
हे चारही जण मुंबई महापालिकेने नेमलेल्या एका सिक्युरिटी एजन्सीत कामाला होते. त्यांच्याकडे रस्त्यावर थुंकणारे नागरिक, अस्वच्छतेला कारणीभूत असलेले लोक यांच्याकडून दंड वसुली करण्याचे काम सोपवण्यात आले होते.
त्यांच्यापैकी अजितसिंह नावाच्या एका सुरक्षा कर्मचाऱ्याने फॅक्टरी मालकाची भेट घेऊन तुम्ही फॅक्टरीत कोविड विषयक निर्बंध पाळत नसल्याने त्यांना कारवाई करण्याची धमकी दिली. त्याच्या बदल्यात त्याने फॅक्टरी मालकाकडे एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. फॅक्टरी मालकाने त्याला 20 हजार रूपये देऊन हे प्रकरण मिटवले.
त्यानंतर त्याच कंपनीतील अन्य चार जण पुन्हा या फॅक्टरी मालकाकडे आले. त्यांनी पुन्हा हाच आरोप करून खंडणी मागितली. त्यानंतर मात्र त्यांनी अंधेरी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी या चौघांना अटक केली.