पुणे – गेल्या 24 तासांत शहरात 93 करोनाबाधितांची नोंद झाली. तर दोन जणांचा बळी गेला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
शहरात मंगळवारी (दि. 28) रात्री तब्बल 143 बाधित सापडले होते. शहरातील बाधितांची एकूण संख्या 1 हजार 432 वर पोहोचली आहे. दरम्यान, शहरातील विविध रुग्णालयात एकूण 980 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 70 जणांची प्रकृती चिंताजनक असून, ससून रुग्णालय, भारती हॉस्पिटल, सिम्बॉयोसिस, नायडू यासह खासगी रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आजपर्यंत 203 जणांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 8 हजार 858 जणांची तपासणी करण्यात आली असून, त्यातील 7 हजार 470 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
करोनाचे दोन बळी
शहरात करोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. गणेश पेठेतील 65 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटलमध्ये बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर ससून रुग्णालयात ताडीवाला रोड परिसरातील 71 वर्षीय व्यक्तीचा संध्याकाळी मृत्यू झाला. या दोघांना अन्य आजार होते, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.