धक्कादायक! ‘माझ्या मुलांना सांभाळा’; करोना रुग्णाची ‘कोविड केअर सेंटर’मध्ये गळफास लावून आत्महत्या

सोलापूर – मानसिक तणावातून कोविड केअर सेंटरमध्ये साडीने गळफास लावून करोनाबाधित रुग्णाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बार्शी येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित पाॅलीटेक्निक काॅलेजमध्ये उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये घडली. उमेश भागवत कोंढारे (वय 37 वर्ष, रा. चिखर्डे, ता. बार्शी) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उमेश कोंढार यांचा 31 मार्च रोजी करोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला होता. त्यानंतर चार दिवस त्यांनी घरीच उपचार सुरु ठेवले होते. मात्र, नंतर त्रास जाणवत असल्याने त्यांना 3 एप्रिलपासून बार्शी येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यासह आई, पत्नी व दोन मुले यांनाही करोना संसर्ग झाला. त्यांनाही त्याच कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, माझे काही खरे नाही. मी आता जगत नाही. मला खुप टेन्शन आले आहे. माझ्या मुलांना सांभाळा व तुम्ही व्यवस्थित राहा अशी सारखी बडबड उमेश कुटुंबियांसमोर करत होता. त्यानंतर आज सकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास त्याने कोविड सेंटरमध्ये साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी मयत उमेश यांची आई व पत्नी यांचे व्हिडीओग्राफी केलेले जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्यांचा कुणावरही संशय किंवा तक्रार नसल्याचे त्यांनी जबाबत स्पष्ट केल्याचे सांगण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.