आठवीतील मुलाला सापडला डायनासोरचा दात

कोलोरॅडो – अमेरिकेतील कोलोरॅडो येथील एका आठवीतील विद्यार्थ्याला टी रेक्स या जातीच्या डायनासोरचा दात सापडला आहे. जोनाथन असे या आठवीतील मुलाचे नाव असून तो या शोधामुळे मोठ्या प्रमाणात खुश झाला आहे.

त्याला जे जहाज सापडले होते ते एवढे बहुमूल्य असल्याची त्याला जाणीव नव्हती पण जेव्हा त्याला त्याबाबत कल्पना आली तेव्हा त्याने डेनवर म्युझियम ऑफ नॅचरल अँड सायन्सला एक मेल पाठवून माहिती दिली.

जंगलात भटकत असताना जोनाथनला एक चमकदार अशी गोष्ट दिसली. ती गोष्ट उचलून हातात घेतली तेव्हा त्याला हा डायनासोरचा दात असेल अशी कल्पना नव्हती पण तो दात टी रेक्स या डायनासोरच्या प्रजातीचा होता. डायनासोरसची ही प्रजाती सहा कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर राहात होती.

हा दात सापडल्यामुळे आता संशोधनाला मदत होणार आहे. या परिसरात या डायनासोरस प्रजातीचे आणखी काही अवशेष सापडतात की काय याबाबत आता संशोधन सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी ब्रिटनमधील चार वर्षे वयाच्या एका मुलीने डायनासोरच्या पायांचे ठसे शोधले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.