उत्तर प्रदेशातील 26 वर्षीय युवतीचा अभिनव उपक्रम
लखनऊ : उत्तर प्रदेशातील शाजापुर या गावातील 26 वर्षीय अर्शी नावाची महिला मुलगी करोना रुग्णांना मोफत ऑक्सिजनचे वाटप करत असून तिच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे परिसरातील लोक आर्शीचे वर्णन सिलेंडरवाली बिटिया असे करत आहेत.
सव्वीस वर्षे वयाच्या आर्शीचे वडील जेव्हा करोना पॉझिटिव्ह झाले त्यानंतर तिला ऑक्सिजनचे महत्त्व कळले आणि त्यानंतर तिने ह्या उपक्रमाला सुरुवात केली ऑक्सिजनभावी लोकांची होणारी फरफट आणि धावपळ बघून तिने मोफत ऑक्सिजन पुरवण्याच्या कामाला सुरुवात केली.आपल्या स्कूटरवर ऑक्सीजन सिलेंडर ठेवून ती रुग्णांच्या घरी देण्याचे काम करत आहे.
आतापर्यंत गेल्या काही दिवसात तिने तब्बल 20 रुग्णांना अशाप्रकारे ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे या कामात तिच्या दोन भावांचे सहकार्यही तिला लाभत आहे आर्शी चे वडील जेव्हा करोनाने आजारी होते तेव्हा त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता पण त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते तेव्हा डॉक्टरांनी तिला ऑक्सीजन सिलेंडर आणण्याची सूचना केली.
आर्शीने जेव्हा कलेक्टरकडे जाऊन ऑक्सिजन सिलेंडरचे मागणी केली तेव्हा घरी उपचार करणाऱ्या लोकांना हा सिलेंडर देता येत नाही अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली त्यानंतर तिने एका सामाजिक संघटनेच्या माध्यमातून ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून आपल्या वडिलांचा जीव वाचवला त्यानंतर तिला या समस्येची तीव्रता कळली आणि घरीच उपचार घेणाऱ्याना ऑक्सीजन सिलेंडर पुरवण्याचे काम तिने सुरु केले या कामासाठी ती कोणतेही पैसे घेत नसल्यामुळे या परिसरात तिची ओळख आता सिलेंडरवाली बिटिया अशी झाली आहे.