सिंगापूर – सिंगापूरमध्ये काही दिवसांपासून करोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सिंगापूरमध्ये दोन दिवसांपूर्वी 3 हजार 577 नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. यातील 630 जण हे परदेशी कामगार होते. करोना रुग्णांची संख्या याच वेगाने वाढत राहिल्यास येथील रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी आव्हानात्मक स्थिती असेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
संसर्ग वाढणार नाही असा विश्वास तज्ज्ञांना आहे. मात्र आर्थिक घडामोडींना चालना देण्यासाठी रुग्णसंख्या स्थिर राखणे आवश्यक असून त्यासाठी मल्टी मिनिस्ट्री टास्क फोर्स प्रयत्नशील आहे. पुढील आठवड्यात साथीचा प्रसार नक्की कसा असेल हे सांगता येत नाही. मात्र येणाऱ्या स्थितीला तोंड देण्यासाठी तत्पर राहणे गरजेचे आहे, असे सिंगापूरचे अर्थमंत्री लॉरेन्स वोंग यांनी म्हटले आहे.
हे कामगार निवारागृहात राहात आहेत. बुधवारी सापडलेल्या रुग्णांमुळे एकूण रुग्णांची संख्या आता 1 लाख 13 हजार 381 झाली आहे. दरम्यान 24 ऑक्टोबरपर्यंत निवासी शुश्रूषा गृहांना भेट देणे बंद करण्यात आले आहे. कारण वृद्धांच्या या केंद्रांमध्ये गेल्या दोन आठवड्यांत जास्त रुग्ण सापडले आहेत. सिंगापूरमधील करोना मृत्यूंचे प्रमाण नवीन 3 मृत्यूंमुळे 133 झाले आहे. जे तीन जण काल मरण पावले त्यांचे लसीकरण करण्यात आले नव्हते. सिंगापूरमधील सुमारे 83 टक्के पात्र नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.