बीजिंग – चीन मध्ये करोनाच्या केसेस पुन्हा वाढू लागल्याचे वृत्त आहे. शनिवारी त्या देशात करोनाच्या 1,807 नवीन स्थानिक पातळीवर संक्रमित प्रकरणे नोंदवली गेली, असे राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले. त्यामुळे चीन मध्ये पुन्हा करोना प्रसाराच्या धास्तीचे वातावरण तयार झाले आहे.
या नवीन संसर्गांपैकी जिलिनमध्ये 1,412, शेनडोंगमध्ये 175, ग्वांगडोंगमध्ये 62, शानक्सीमध्ये 39, हेबेईमध्ये 33, जिआंगसूमध्ये 23, टियांजिनमध्ये 17 आणि उर्वरित प्रकरणे 12 अन्य प्रांतीय प्रदेशांमध्ये नोंदवण्यात आली आहेत, करोनाचे प्रमाण वाढताना दिसत असले तरी त्यात अलिकडच्या काळात कोणाचाही मृत्यू झालेला नाही.
ही वाढती प्रकरणे जुन्याच प्रकारच्या विषाणुंची आहेत की करोनाच्या नव्याने प्रसारीत होत असलेल्या विषाणुंची आहेत याचा अभ्यास सुरू आहे. दरम्यान चीन सरकारने विविध भागातील निर्बंध पुन्हा कडक करायला सुरूवात केली आहे.