नवी दिल्ली – देशात करोना संसर्गाचा पुन्हा उद्रेक होत असून, सर्वसामान्यांपासून ते अगदी मंत्र्यांपर्यंत सर्वचजण करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना देखील करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.
I have tested positive for Corona today with mild symptoms. I am under home quarantine. I request everyone who have recently come in my contact to isolate themselves and get tested.
— Rajnath Singh (मोदी का परिवार) (@rajnathsingh) January 10, 2022
याबाबत राजनाथ सिंह यांनी स्वत: ट्विट करून माहिती दिली आहे. माझी आज सौम्य लक्षणांसह करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी होम क्वारंटाईनमध्ये आहे. नुकतेच माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला मी विनंती करतो की, त्यांनी स्वत:चे विलगीकरण करून घ्यावे आणि तपासणी करून घ्यावी, असे आवाहन राजनाथ सिंह यांनी केले आहे.