मुंबईच्या झोपडपट्ट्यांमधील करोना हद्दपार

मुंबई – आशिया खंडातील सर्वात मोठी दाटवस्ती असलेली झोपडपट्टी धारावीची वाटचाल आता करोनामुक्तीच्या दिशेने सुरु झालेली पाहायला मिळत आहे. धारावीमध्ये आज एकाही नवीन करोना बाधित रुग्णाची नोंद झाली नसून सध्या फक्त करोनाचे 11 सक्रीय रुग्ण राहिले आहेत.

एकीकडे मुंबईतल्या झोपडपट्ट्यांनी आणि दाटीवाटीच्या वस्त्यांनी करोनामुक्तीच्या दिशेने पाऊल टाकले असताना मुंबईतील उच्चभ्रु वस्तीतील इमारतींमधली रुग्णसंख्या घटण्याचा वेग मात्र धीमा आहे.

सध्याच्या घडीला मुंबईत 83 इमारती सिल्ड आहेत तर केवळ 22 ठिकाणी झोपडपट्टी आणि चाळींमध्ये कंटेंटमेंट झोन राहिले आहेत. 24 पैकी 18 वॉर्डमध्ये एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही. मुंबईतील सर्वाधिक धोका असलेल्या दाटीवाटीच्या भागाला मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये करोनाने शिरकाव केल्यानंतर दाटीवाटीने वसलेल्या आशियातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीची चिंता वाढली होती. मात्र, आता दुसऱ्या लाटेतही धारावीनं रुग्णसंख्येचा शून्य आकडा गाठला.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.