नगर – भिंगार बॅंकेने नेहमीच लोकाभिमुख सेवा देऊन सर्वस्तरातील नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्याचे काम केले आहे. त्यामुळे बॅंकेवर सर्वांचा विश्वास आहे. हीच सेवा पुढील काळातही चांगल्या पद्धतीने सुरु ठेवण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करु.
बॅंकेच्या प्रगतीत कर्मचाऱ्यांचेही मोठे योगदान आहे. कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कामामुळे ग्राहकांना चांगली सेवा मिळत आहे. बॅंकेला आदर्शवत बनविण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न सुरु आहे, असे प्रतिपादन भिंगार बॅंकेचे अध्यक्ष अनिल झोडगे यांनी केले.
भिंगार बॅंकेचे नूतन अध्यक्ष अनिल झोडगे, संचालक कैलास खरपुडे, एकनाथ जाधव व पांडूरंग हजारे यांचा माळावाडा शाखेतील कर्मचाऱ्यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाखाधिकारी संतोष मिसाळ, अधिकारी निलेश राऊत, आदिनाथ बोडखे, संदीप मिसाळ, सुनिल राऊत, सोनार आदी उपस्थित होते.
याप्रसंगी शाखाधिकारी म्हणाले, भिंगार अर्बन बॅंकेच्यावतीने ग्राहकांना उत्तम, चांगली व आधुनिक सेवा देत आहोत.
माळीवाडा शाखा शहरातील ग्राहकांचे हित जोपासात आहे. यावेळी नूतन चेअरमन अनिल झोडगे यांनी शाखेतील कामकाजाचा आढावा घेतला. शाखाधिकारी संतोष मिसाळ यांनी माहिती सांगितली.