बॉलीवूड अभिनेता संजय दत्त सध्या लंग कॅन्सर आजाराशी झुंज देत आहे. यामुळे त्याच्या दीर्घआयुष्यासाठी चाहत्यांकडून प्रार्थना करण्यात येत आहे. कॅन्सरवर उपचार सुरू असतानाच संजय दत्तने नुकतीच दुबईला जावून आपल्या मुलांची भेट घेतली आहे.
View this post on Instagram
I miss them so much❤️ To everyone who is with their families right now, cherish them!
संजय दत्तची पत्नी मान्यताने दुबईतील आपल्या संपूर्ण फॅमिलीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत संजय आपल्या पत्नी आणि मुले शहरान आन् इकिरा यांच्यासोबत दिसत आहे. यात संजय दत्तने क्लीन शेव केल्याचे दिसते. या फोटोवरून संजय दत्त आपल्या कुटुंबीयांची भेट घेतल्याने खुपच आनंदीत असल्याचे दिसून येते.
हा फोटो पोस्ट करत मान्यताने लिहिले की, ‘मला कौटुंबिक म्हणून मिळालेल्या या भेटींबद्दल देवाचे आभार मानायचे आहेत. कोणतीही तक्रारी नाही… विनंत्या नाहीत… फक्त असेच कायमचे एकत्र राहावो.’ लॉकडाऊनच्या काळात मान्यता ही मुलांसह दुबईत होती. तर संजय दत्त हा आजारपणामुळे ऑगस्ट महिन्यात मुंबईत परतला होता.
दरम्यान, संजय दत्तला 8 ऑगस्ट रोजी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयात भर्ती करण्यात आले होते. यानंतर त्याला लंग कॅन्सर असल्याचे निदान झाले. संजय दत्तवर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर तो आता दुबईला गेला आहे.