सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष, परिवर्तनवादी, पुरोगामी सामाजिक संघटना यांचे प्रमुख पदाधिकारी व सर्व घटक पक्षांचे तालुकाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, तालुका उपप्रमुख व पक्षांच्या सर्व आघाड्या व सेलचे जिल्हाप्रमुख, इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोमवारी( दि. 11) दुपारी 2 वाजता येथील राष्ट्रवादी भवनामध्ये बैठकीचे आयोजन इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे. या बैठकीस सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षल कदम, सचिन मोहिते व संजय भोसले यांनी केले आहे.