#Video : आयटीबीपी जवानाच्या आवाजातलं ‘हे’ गाणं तुमच्या ह्रदयाला भिडेल

पुणे – आयटीबीपीला भारत-चीन सीमेवरील सुरक्षा भिंत म्हणून ओळखलं जातं. इंडो-तिबेटीयन सीमा पोलीस दलातील (ITBP) जवानांच्या शौर्यगाथा आपण ऐकल्या असतील; पण याच जवानांचं एक अनोखं रुप जगासमोर आलंय.

इंडो-तिबेटीयन सीमा पोलीस दलातील काॅन्सटेबल लवली सिंह यांनी बॉर्डर चित्रपटातील ‘संदेसे आते हैं’ हे गाणे गायले आहे आणि स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला या गाण्याचा व्हिडीओ आयटीबीपीनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. त्यात लवली सिंह हे एखाद्या कसलेल्या कलाकाराप्रमाणं गाणं गात आहेत. त्यांनी हे गाणं आपल्या साथीदार जवानांना समर्पित केलं असल्याचे म्हटले आहे.

‘ए गुजरने वाली हवा बता मेरा इतना काम करेगी क्या’ असे गाण्याचे बोल आहेत. सीमेवर डोळ्यांत तेल घालून या भूमातेचं रक्षण करणाऱ्या या जवानाचे सूर थेट मनाला भिडताहेत. त्याचा या गाण्याच्या व्हिडीओला चांगलीच पंसती मिळत असून अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)