चिखली, (वार्ताहर) – स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे संस्कृती संवर्धन व विकास महासंघ विभागाचे संस्कृती संवर्धन भजन महासंघ (चिखली विभाग) ‘चैत्रगौरीचे हळदी कुंकू’ श्री शनी मंदिर, पूर्णानगर येथे झाले. मुख्यतः संभाजीनगर, शाहूनगर, पूर्णानगर व शिवतेजनगर भागातील महिलांची उपस्थिती या कार्यक्रमाला होती. महिला भजन महासंघाच्या सर्व विभागातील महिला उपस्थित होत्या.
चैत्र गौरी संस्कृती संवर्धन भजन महासंघातर्फे भजन सेवेचा कार्यक्रम आयोजित केला होता. चैत्रगौरीची सजावट अगदी पारंपरिक पद्धतीने करून सर्वांना कैरीची डाळ, पन्हे, हरभर्याची ओटी देण्यात आली. चैत्रगौरी भजनसेवा देणार्या भगिनींनी अतिशय गोड, सुरेल आवाजात भजने गाऊन कार्यक्रमामध्ये प्रसन्नता, चैतन्य निर्माण केले.
चैत्र गौरी हा कार्यक्रम सफल करण्यासाठी संस्कृती संवर्धन भजन महासंघाच्या अध्यक्षा अर्चना सोनार, जयश्री करमरकर, पुष्पा साळुंखे, ज्योती जोशी, ज्ञानवती शर्मा यांनी परिश्रम घेतले.