पुणे : ई-बसचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते होणार

पीएमपीच्या ताफ्यात गुरूवारपासून 107 नवीन बस

पुणे : पीएमपीच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या 125 ई बस आणि 154 सीएनजी बसचे उद्घाटन उद्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पूरस्थितीमुळे या बसेसच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत तसेच शहारतील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थी यांच्या हस्ते या बसेसचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात 125 ई बस आणि 50 सीएनजी बस आल्या असून उद्यापासून 57 ई बस आणि 50 सीएनजी बस पीएमपीच्या संचलनात सामील होणार आहे.

दरम्यान, या बस शहरात आल्या तरी, मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने त्या संचलनात आणण्यात आल्या नव्हत्या. महापालिकेच्या नवीन इमारतीसमोर सकाळी साडेनऊ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)