Varanasi loksabha 2024 : उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षासोबत आघाडीत असलेल्या कॉंग्रेसला १७ जागा मिळाल्या आहेत. त्यात अमेठी आणि रायबरेलीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ असलेल्या वाराणसीचाही समावेश आहे. येथून कॉंग्रेसने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना रिंगणात उतरवले आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशात कॉंग्रेसने १३ उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र चार उमेदवार अद्याप जाहीर केले नाहीत. त्यात प्रामुख्याने रायबरेली आणि अमेठी मतदारसंघांचा समावेश आहे. | Varanasi loksabha 2024
भाजपनेही अमेठीत स्मृती इराणींना उमेदवारी दिली असली तरी रायबरेलीतील उमेदवाराचे नाव अद्याप जाहीर केले नाहीत. त्यांचे अन्य सगळे उमेदवार मात्र प्रचाराला लागले आहेत. उत्तर प्रदेशात यावेळी भाजपविरोधात एकास एक लढत देण्याचा कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षाचा प्रयत्न होता. | Varanasi loksabha 2024
तथापि, बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी प्रचार सुरु करून आतापर्यंत आपले २५ उमेदवार जाहीर केले आहेत. त्या सगळ्याच जागा लढवणार असल्याचे सांगितले जाते आहे. त्यामुळे येथे यंदाच्या निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. | Varanasi loksabha 2024