Stock Market New Rules T+0 : शेअर्सच्या खरेदी-विक्रीसाठी पैशांच्या व्यवहाराचा नवीन नियम गुरुवारपासून म्हणजेच 28 मार्च 2024 पासून लागू झाला आहे. BSE ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 28 मार्चपासून T+0 सेटलमेंट सिस्टम अंतर्गत ट्रेडिंग सुरू होत आहे. पण हा सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू होत आहे, म्हणजेच काही तासांसाठी निवडक शेअर्ससह सुरू केला जात आहे. एक्सचेंज भाषेत त्याचे वर्णन बीटी आवृत्ती असे केले गेले आहे. भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत आहे. (New Rules: What is the benefit of the new T+0 rule implemented in the stock market? Learn in simple language)
काय आहे नवीन नियम T+0 –
T-0 सेटलमेंट अंतर्गत, जे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतात त्यांना शेअर्स विक्री केल्यानंतर पैसे मिळण्यासाठी एक दिवस वाट पाहावी लागणार नाही. आता T+0 सेटलमेंट अंतर्गत शेअर्स विकल्यावर लगेच खात्यात पैसे येतील. ही सेटलमेंटची व्यवस्था ऐच्छिक तत्त्वावर उपलब्ध होणार आहे. हा आता एक पर्याय म्हणून सादर केला जात असल्याने, टी-1 सेटलमेंट सध्या सुरूच राहणार आहे.
सेबीला त्वरित सेटलमेंट पूर्णपणे लागू करण्यासाठी एक वर्ष लागेल. सध्या, भारतीय स्टॉक एक्स्चेंज सर्व शेअर्ससाठी 1+1 सेटलमेंट सायकलवर काम करते, ज्यामध्ये ऑर्डर पूर्ण झाल्यानंतर 24 तासांनंतर रक्कम किंवा शेअर्स खात्यात जमा केले जातात.
नवीन नियम फक्त 25 समभागांमध्ये लागू होईल –
सेबीने प्रायोगिक तत्त्वावर टी+० व्यवहारपूर्ती लागू करताना ती २५ कंपन्यांसाठी लागू केली आहे. यामध्ये अंबुजा सिमेंट्स, अशोक लेलँड, बजाज ऑटो, बँक ऑफ बडोदा, भारत पेट्रोलियम, बिर्लासॉफ्ट, सिप्ला, कोफोर्ज, डिव्हीज् लॅबोरेटरीज, हिंदाल्को इंडस्ट्रीज, इंडियन हॉटेल कंपनी, जेएसडब्ल्यू स्टील, एलआयसी हाऊसिंग फायनान्स, एलटीआय माइंडट्री, एमआरएफ, नेसले इंडिया, एनएमडीसी, ओएनजीसी, पेट्रोनेट एलएनजी, संवर्धन मदरसन इंटरनॅशनल, भारतीय स्टेट बँक, टाटा कम्युनिकेशन्स, ट्रेन्ट, युनियन बँक ऑफ इंडिया आणि वेदान्त या २५ कंपन्यांसाठी ही पद्धत लागू करण्यात आली आहे.
नव्या T+0 नियमाचा फायदा काय?
शेअर बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले की, यामुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांची संख्या वाढेल. रिटेल म्हणजेच लहान गुंतवणूकदार सहसा बाजारापासून दूर राहतात कारण त्यांचे पैसे त्यांच्यापर्यंत त्याच दिवशी पोहोचत नाहीत. आता दलालांजवळ गुंतवणूकदारांचा पैसा राहणार नाही. यामुळे धोका कमी होईल. किरकोळ गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढेल. पूर्ण अंमलबजावणीनंतर, डिमॅटची संख्या झपाट्याने वाढेल.
जर गुंतवणूकदारांनी ट्रेडिंगच्या दिवशी दुपारी 1:30 वाजेपर्यंत शेअर्स खरेदी केले किंवा विकले, तर त्यांचे सेटलमेंट 4:30 वाजेपर्यंत केले जाईल. म्हणजे त्यावेळेत पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील. दुस-या टप्प्यात, दुपारी 3:30 वाजेपर्यंत केलेल्या सर्व व्यवहारांसाठी एक पर्यायी तत्काळ व्यापार-द्वारा-व्यापार सेटलमेंट सुविधा प्रदान केली जाईल.