नवी दिल्ली : गॅस दरवाढ मागे घेण्याच्या मागणीसाठी दिल्ली कॉंग्रेसने गुरूवारी येथे निदर्शने केली. स्वयंपाकासाठी वापरला जाणारा विनाअनुदानित गॅस सिलिंडर 19 रूपयांनी महागला.
त्यावरून विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केले. त्यानंतर दरवाढीचा निषेध करण्यासाठी दिल्ली कॉंग्रेसने निदर्शने केली. त्यावेळी बोलताना दिल्ली कॉंग्रेसचे अध्यक्ष सुभाष चोप्रा यांनी अवघ्या पाच महिन्यांत देशाच्या राजधानीत गॅस सिलिंडर तब्बल 140 रूपयांनी महागल्याकडे लक्ष वेधले.
महागाईमुळे आधीच पिचलेल्या दिल्लीकरांना दिलासा देण्यासाठी आप सरकारने गॅस सिलिंडरवर अनुदान द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. गॅस दरवाढीबाबत आपने मौन का बाळगले आहे, असा सवाल त्यांनी विचारला. त्यामुळे गॅस दरवाढीवरून कॉंग्रेसने एकाचवेळी भाजप आणि आपवर निशाणा साधल्याचे दिसून आले.