सांगली : अत्यंत चुरशीच्या बनलेल्या सांगली जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा भाजपने बाजी मारली. अध्यक्षपदी भाजपच्या प्राजक्ता नंदकुमार कोरे व उपाध्यक्षपदी भाजपचे शिवाजी ऊर्फ पप्पू राजाराम डोंगरे विजयी झाले.
भाजपच्या कोरे यांना 35 मते, तर विरोधी कॉंग्रेसच्या कलावती गौरगोंड यांना 22 मते मिळाली. भाजपच्या डोंगरे यांना 35 मते, तर विरोधी कॉंग्रेसच्या जितेंद्र पाटील यांना 22 मते मिळाली. त्यामुळे भाजपने जिल्हा परिषदेतील आपला गड अबाधित राखला आहे. कोरे व डोंगरे समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.