Allahabad Lok Sabha Election 2024 – उत्तर प्रदेशातील सर्वात प्रतिष्ठेच्या अलाहाबाद येथील जागेवरून कॉंग्रेसने माजी मंत्री आणि खासदार रेवती रमण सिंह यांचे पुत्र उज्ज्वल रमण सिंह यांना उमेदवारी दिली आहे. गेल्या ४० वर्षांपासून अलाहाबाद येथे कॉंग्रेसचा सातत्याने पराभव होतो आहे. १९८४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सुपरस्टार अमिताभ बच्चन या मतदार संघातून विजयी झाले होते. कॉंग्रेसला मिळालेला हा शेवटचा विजय होता.
उज्ज्वल रमण सिंह अलाहाबादच्या (आता प्रयाग राज) करछना विधानसभा मतदार संघातून दोनदा आमदार झाले आहेत. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा जवळपास १० हजार मतांनी पराभव केला होता. रिटा बहुगुणा जोशी या भाजपच्या येथील खासदार होत्या. मात्र त्यांचे तिकिट कापून भाजपने माजी राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांचे पुत्र नीरज त्रिपाठी यांना प्रयागराज येथून रिंगणात उतरवले आहे. उज्ज्वल रमण सिंह हे समाजवादी पक्षात होते.
२ एप्रिल रोजी त्यांनी सपाला रामराम करत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे आणि कॉंग्रेसने त्यांना खासदाकरीचे तिकीट दिले. आता या मतदारसंघात दोन नवे चेहरे खासदार होण्यासाठी रिंगणात उतरले असल्यामुळे मतदार कोणाच्या बाजूने कौल देतील याची उत्सुकता आहे.