फलटण – फलटण शहर तालुका व शहर काँग्रेसचे काम जिल्ह्यामध्ये प्रशंसनीय आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुका या इंडिया आघाडीच्या माध्यमातून लढण्यात येणार असून सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावेत यासाठी प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा काँग्रेसचे प्रभारी श्रीरंग चव्हाण-पाटील यांनी केले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा काँग्रेसच्या वतीने फलटण तालुका व शहर काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न झाली.
यावेळी सातारा श्रीरंग चव्हाण-पाटील बोलत होते. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश जाधव, महिला काँग्रेस च्या अध्यक्षा अल्पना यादव, सरचिटणीस नरेश देसाई, सर्जेराव पाटील, फलटणचे निरीक्षक राजूभाई मुलाणी तसेच जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी सर्जेराव पाटील, मानाजीराव घाडगे, मुकेश मोहिते, दांगट पाटील,मंजिरी पानसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महेंद्र सूर्यवंशी बेडके यांनी प्रास्ताविकात फलटण तालुक्याचा आढावा सादर केला. श्रीरंगनाना चव्हाण यांनी फलटण तालुक्यातील काँगेस कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे तसेच गाव भेट दौरा चालू करावा असे सांगितले.
याप्रसंगी प्रदेश प्रतिनिधी सचिन भैय्या सूर्यवंशी बेडके, फलटणचे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके,उ पाध्यक्ष राजेंद्र खलाटे,ओबीसी सेलचे अल्ताफ पठाण, बालम शेख, जिल्हा युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस गंगाराम रणदिवे, तालुका व शहर काँग्रेसचे पदाधिकारी शिवाजी भोसले, मनोहर गायकवाड, बालमुकुंद भट्टड, विकास ननवरे, अजय इंगळे, मंझेखान मेटकरी, अजय बेडके, दिलीप आवारे, विजय जगताप, अजय ढेंबरे, अच्युत माने, निळकंठ निंबाळकर, संतोष बाचल व तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शहराध्यक्ष पंकज पवार यांनी सुत्रसंचालन केले. कार्याध्यक्ष अमिरभाई शेख यांनी आभार मानले.