पुणे – काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारासाठी ४० स्टार प्रचारकांची यादी नुकतीच जाहीर केली. यात प्रमुख नेत्यांसह पुण्यातील रमेश बागवे, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, अॅड. असीम सरोदे यांचा समावेश आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी, प्रियंका गांधी, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजीत कदम, मुकुल वासनिक, सतेज (बंटी) पाटील, चंद्रकांत हंडोरे, यशोमती ठाकूर, शिवाजीराव मोघे, अमित देशमुख, कुणाल पाटील, भालचंद्र मुणगेकर, सुनील केदार आदी प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.
यांच्यासह पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर उमेदवार निश्चितीसह सर्वच राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांच्या याद्या तयार केल्या आहेत. त्यानुसार काॅंग्रेस पक्षानेही नियोजन केले आहे.