पौड (वार्ताहर) – पेट्रोल, डिझेल इंधन दरवाढीच्या विरोधात केंद्र सरकारला जाब विचारण्यासाठी तहसीलदार कार्यालय पौड येथे मुळशी तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने नायब तहसीलदार पाटील भगवान यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, करोना विषाणूच्या प्रादुर्भावने थैमान घातले आहे. यामध्ये लोकांची आर्थिक स्थिती प्रचंड खालावली आहे. त्यातच शासनाने केलेल्या डिझेल, पेट्रोल दरवाढीमुळे सर्व स्तरातील नागरिक हैराण झाले आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत दिवसागणिक घट होऊनदेखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ होताना दिसतेय.
झालेली दरवाढ त्वरित थांबवून पेट्रोल, डिझेलच्या वाढलेल्या किमती कराव्यात, अशी जनतेची भावना आहे. यावेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गंगाराम मातेरे, जिल्हा उपाध्यक्ष संजय उभे, दादाराम मांडेकर, युवक अध्यक्ष सुहास भोते, भोर विधानसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल जाधव, अमित जांभूळकर, रोहिदास केमसे, नेताजी गाडेकर, रिहे गावचे उपसरपंच राम ओझरकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.